Saturday, December 29, 2012
Wednesday, December 26, 2012
Quotes from Book "TOCH CHANDRAMA"
१. सारे जरि ते तसेच धुंदी आज ती कुठे?
मीहि तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!
२. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्याला
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
३. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे!
४. मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा!
मीहि तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!
२. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्याला
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
३. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे!
४. मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा!
Author : – Shanta Shelake
Book : - Toch Chandrama…
Friday, December 21, 2012
Quotes from Book "VYAKTI AANI VALLI"
१. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांचे 'भय्या' आणि 'मद्राशी' असे दोन स्थल विभाग मी करू शकतो. विभाग जरा स्थूल वाटला तर 'वानियाभय' असेल असा अंदाज. ह्या वानियाभायामध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. 'शीख' ओळखता येतो; पण कालचा शीख आज ओळखता येत नाही."
२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?
Author : – Pu. La. Deshpande
Book : - Vyakti Aani ValliSaturday, December 15, 2012
Quotes from Book "VIDHAVAKUMARI"
१. खोटं म्हणजे काय?
जे माणसाला सुचतं, पण देवाला रुचत नाही ते खोटं.
जे माणसाला सुचतं, पण देवाला रुचत नाही ते खोटं.
Author : – Mama Varerkar
Book : - VIDHAVA KUMARI
Monday, December 10, 2012
Quotes from Book "AMRUTVEL"
१.
स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला
आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा
शोध घेण्यात आहे.
२.
कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो!
पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती
माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या
नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या
आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
३.
जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड
मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती
कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर
उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी
घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात.
मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत
जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार
नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही.
Author : – Vi. Sa. Khandekar
Book : - AmrutvelWednesday, November 28, 2012
Monday, November 19, 2012
Quotes from Book "BAI, BAIKO, AANI CALENDAR"
१. दात जिभेला म्हणतात,
'हम बत्तीस तू अकेली, बसी हमारी माय..
जरासी कतर खाउं तो फिर्याद कहां ले जाय?'
त्यावर जीभ म्हणते,
'मानती हुं मैं अकेली, तुम बत्तीस, बसी तुम्हारी माय
जरासी तेढी बात करूं तो बात्तीसही गिर जाये.'
Author : – Va. Pu. Kale
Book : - Bai, Baiko, CalendarFriday, November 9, 2012
Tuesday, October 9, 2012
Quotes from Book "SAMPURNA BALAKRAM"
१. आम्हा पौर्वात्यांच्या
आणि पाश्चात्य इंग्रजांच्या आचार विचार कल्पनांत जे दक्षिनोत्तर अंतर आहे
ते लक्षात येते. इकडे आम्ही 'गरजवंताला अक्कल नाही' असे म्हणतो, तर तिकडे
इंग्रज लोक 'गरज हि शोधाकतेची आई आहे!' आस्व त्याबरहुकूम गरजेचा मारा
चुकवितात आणि उलट 'अक्क्ल्वान्ताला गरज नसते' असा व्यत्यास सिद्ध करून
दाखवितात.
2. “His Verticality Went into His Horizontility” साधा अर्थ तो पडला.
Author : – Ram Ganesh Gadakari
Book : - Sampurna Balakram
Friday, September 28, 2012
Quotes from Book "YAYATI"
१. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी.
२.
जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर
चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो.
मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक
असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.
३.
या जगात जो तो आपापल्याकरीता जगतो, हेच खरे, वृक्षवेलींची मुळे जशी
जवळच्या ओलाव्याकडे वळतात. तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार
शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते;
पण खरोखरचं ते आत्माप्रेम असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर
वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे..
मग तो जवळ असो, नाही तर दूर असो, हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत
राहतात.
४. दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा.
५. कुणाचही दु:ख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा.
६.
मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी, आणि मन हा लगाम
आहे. विविध इंद्रियं हे घोडे, उपभोगांचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि
इंद्रीय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.
७.
इंद्रियं हे या शरिर रथाचे घोडे होत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा
चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून रथ
केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम
नाही; म्हणून इंद्रिय रुपी घोड्यांना मनाच्या लागमच सतत बंधन हवं; पण हा
लगाम देखील सतत सारथ्याच्या हातात असायला हवा! नाही तर तो असून नसून
सारखाच! म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं
हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी
रथ जाणार कुठे? त्याचं कार्य काय? सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी
प्रत्येकात 'मी' च्यारुपाने असतो, तो आत्माच या शरीररुपी रथातला रथी होय.
८. या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे.
Author:– Vi. Sa. Khandekar
Book:- YAYATISaturday, September 1, 2012
Quotes from Book VIDYUTPRAKASH
१. जग मनुष्यांच्या खेळाकरिता निर्माण झालेले नाही, देवाच्या खेळाकरिता ते आहे. माणसे म्हणजे काय? नुसती खेळणि.
२. जुगाराला लोक वाईट म्हणतात; पण खरोखर सगळे जग जुगारी आहे. डॉक्टर रोग्याला वाचविण्याची, वकील आरोपीला फासावरुन सोडविण्याची किंवा मास्तर मुलाला वरच्या इयत्तेत घालण्याची हमी थोडीच देतात! पण लोक त्यांना पैसे देतातच की नाही? शिवाय सगळे जग नशिबावर चालले आहे बघा. जुगार म्हणजे नशीब! आणखी काय आहे दुसरे? जन्म हा जुगार, परीक्षा हा जुगार, लग्न हा जुगार, आणि मरण हाही जुगाराच.
Author – Vi. Sa. Khandekar
Book - VidyutprakashSunday, August 19, 2012
Quotes from Book Mayabazaar
१. सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.
२. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझ झटकता येते. कारण पदवीपुरातच त्या हॉलशी संबंध असतो. पण जगताना शब्द जेव्हा झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो.
Author – Va. Pu. Kale.
Book - MayabazaarSunday, August 5, 2012
Quotes from book "KARMCHARI"
१.
"स्वत:पेक्षा जरा कमी असलेल्या माणसाशीच दुसरा मैत्री करतो. पैशाने,
बुद्धीने, प्रत्येक बाबतीत दुसरा कुठे कमी आहे हे हेरल्यावरच त्या
प्रांतापुरती मैत्री होते."
२. "गांधारी ..... महाभारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती. अर्जुन, कर्ण, भीष्म, कृष्ण, ह्यासारख्या महाभारतातील
प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला.
विद्वत्ता, शोर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो. कुणाची कुचंबना झाली
नाही. गांधारी सर्वात श्रेष्ठ आपण होऊन अंधत्व पत्करणारी. तिने हे दिव्य
कसं केलं माहित आहे? डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलचं आहे, हे
ओळखल्यामुळे. तो क्षण आपला. म्हणू तेव्हा उगवू शकतो, ह्या आधारावर."
३. एकाने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली तर श्रावणी."
Author – Va. Pu. Kale.
Book - KarmachariSaturday, July 21, 2012
Quotes from Book: SATTANTAR
1. “कला म्हणजे जाणिव आणि नेणीव यांची लग्नगाठ”
2. “Art is a Marriage of Conscious and Unconscious.
3. “काळाप्रमाणे
संघर्ष हा सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर
असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंड भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा
तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण
होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात
धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं.
तेव्हा संघर्ष उतू जातो.
Friday, June 22, 2012
Saturday, June 16, 2012
Monday, June 4, 2012
Sunday, May 27, 2012
Friday, May 18, 2012
Tuesday, May 8, 2012
Subscribe to:
Posts (Atom)