Tuesday, March 23, 2010

Quotes from Book "Vidyutprakash"


१. जग मनुष्यांच्या खेळाकरिता निर्माण झालेले नाही, देवाच्या खेळाकरिता ते आहे. माणसे म्हणजे काय? नुसती खेळणि.
२. जुगाराला लोक वाईट म्हणतात; पण खरोखर सगळे जग जुगारी आहे. डॉक्टर रोग्याला वाचविण्याची, वकील आरोपीला फासावरुन सोडविण्याची किंवा मास्तर मुलाला वरच्या इयत्तेत घालण्याची हमी थोडीच देतात! पण लोक त्यांना पैसे देतातच की नाही? शिवाय सगळे जग नशिबावर चालले आहे बघा. जुगार म्हणजे नशीब! आणखी काय आहे दुसरे? जन्म हा जुगार, परीक्षा हा जुगार, लग्न हा जुगार, आणि मरण हाही जुगाराच.


Author – Vi. Sa. Khandekar
Book - Vidyutprakash







No comments:

Video